नवल राठोड (देऊळगाव साकरशा)
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्राने (PHC) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून उद्दिष्ट पूर्तीत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे. शासनाने दिलेले ११९ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी सातत्याने मेहनत घेत आहेत. आतापर्यंत ३२ शस्त्रक्रिया करून उद्दिष्टपूर्तीचा वेग कायम राखला आहे.
वरिष्ठांकडून प्रशंसा व पाठबळ
PHC ची ही सातत्यपूर्ण कामगिरी पाहता तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देऊळगाव साखरशा केंद्राला विशेष पाठराखण मिळत आहे.
शस्त्रक्रिया शिबिरे, साहित्य उपलब्धता, तांत्रिक मदत, कर्मचारी यांची गरज याबाबत वरिष्ठांकडून तातडीने सहकार्य दिले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश परिहार डॉ, अनिकेत राठोड यांनी दिली.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्राणपणाने प्रयत्न
,गरोदर माता नोंदणी व तपासणी, प्रसृती,बालकांचे संपुर्ण लसीकरण, क्षयरोग कार्यक्रमामध्ये प्रथम क्रंमाक निश्चय, नोंदी , कुष्ठरोग शोध मोहीम अवल स्थांनी असुन 3 रुण शोधुन उपचारा सुरु केले आहे, . मेहकर तालुका मध्ये प्रथम क्रमांक आहे ग्रामीण भागात आव्हानात्मक गोष्ट मानली जाते. यासाठी डॉक्टर, ANM, आशा वर्कर, आरोग्य सेवक यांनी घराघरांत जाऊन
समुपदेशन,
लाभार्थ्यांची ओळख पटवणे,
कागदपत्रे तपासणी,
रुग्णांना सुरक्षितपणे शिबिरात सहभागी करणे
ही प्रक्रिया सातत्याने राबवली आहे.
लॅप्रोस्कोपी शिबिराची तयारी
दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या लॅप्रोस्कोपी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरासाठी सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साहित्य, समुपदेशन मदत, तांत्रिक पाठबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
उद्दिष्टपूर्तीकडे वेगाने वाटचाल
प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव साखरशा यांनी केलेल्या कामगिरीमुळे तालुक्यातील आरोग्य विभाग बळकट झाला आहे. उर्वरित शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचारी अधिक उत्साहाने काम करत असून केंद्र लवकरच तालुक्यात पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्टता दाखवल्याबद्दल आरोग्य विभाग व ग्रामस्थांकडून देऊळगाव साखरशा PHC च्या टीमचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments