नवल राठोड( देऊळगाव साकरशा)
मेहकर विधानसभा मधील मेहकर व लोणार तालुक्यामधील सर्व क्लिनिकल धारकांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त कार्यकारिणी गठित करत असताना या वर्षी येऊ घातलेल्या महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅस्लिशमेंटस नोंदणी आणि नियमन विधेयक २०२६ बिलासदर्भात चर्चा करून मेहकर विधानसभेची कार्यकारणी गठित केली. मार्गदर्शक विजय छबिले व रमेश विभुते, अध्यक्ष संदीप दहातोंडे, उपाध्यक्ष विवेक निकम, सचिव प्रदीप दुतोंडे, सहसचिव समाधान हाडे, कोषाध्यक्ष संतोष शीलवंत, सोशल मीडिया प्रमुख श्रीकृष्ण काकडे उर्वरित मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व टेक्निशियन यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आला *केंद्र सरकारने क्लिनिकल लॅब एस्टॅलिस्टमेंट ऍक्ट 2010 अंतर्गत भारतातील वैद्यकीय प्रयोगशाळा, दवाखाने, डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅब, रुग्णालय इत्यादीच्या नोंदणी व नियमांशी संबंधित कायदा पारित केला. महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम राज्यपालांनी प्राध्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम आणि विधी व न्याय विभागाकडून आलेली विधेयके भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 348 च्या खंड ३ च्या अनुषंगाने महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिमेंटस नोंदणी आणि नियमन विधेयक 2026 बिल शासकीय राजपत्रात पारित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने , हायकोर्ट 2002 च्या आदेशानुसार क्लिनिकल लॅब ला वगळण्यात आल्याने क्लिनिकल लॅब संघटना मजबूत करून सदर महाराष्ट्राच्या महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅस्लिशमेंटस नोंदणी आणि नियमन विधेयक 2026 बिलाच्या समिती व उपसमितीमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्व क्लीनिकल लॅब संघटना एकवटल्या आहे*.
एम एल टी पी ए संघटनेचे राज्याचे सोशल मीडिया प्रमुख अतुल उरसाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश संघटक सचिन कोकाटे, ज्येष्ठ लॅब टेक्निशियन विजय छबिले ,रमेश विभुते, श्रीकृष्ण काकडे, अनिल डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटक सचिन कोकाटे यांनी केंद्र सरकारचा क्लिनिकल या एस्टॉस्लिशमेंट 2010 व महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॉस्लिशमेंट नोंदणी आणि नियमन विधेयक बिल २०२६ हे क्लिनिकल लॅब साठी टांगती तलवार असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे. अध्यक्ष अतुल उरसाल यांनी १५ वर्ष संघटनेच्या यशस्वी कार्याबद्दल प्रकाश टाकून या विधेयकाचे संभाव्य धोके विशद करून, या विधेयक बिलाच्या समिती व उपसमितीमध्ये क्लिनिकल लॅब संघटनेच्या परिषदेचा सदस्य पोचवून आपले म्हणणे शासन, प्रशासन व सरकारला पोचविण्यासाठी सर्व क्लिनिकल लॅब संघटना एकत्र येऊन संघटना मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान हाडे यांनी केले तर प्रस्ताविक संदीप दहातोंडे आभार प्रदर्शन विवेक निकम यांनी केले.

Post a Comment
0 Comments