आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क.
मेहकर : नायगाव देशमुख ते MDR-45 या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राहुल किशोरबाप्पू देशमुख, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वाखाली गोपाल सुरडकर, राम जाधव व ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
सुमारे 3.800 कि.मी. लांबीचा हा रस्ता अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे तात्काळ नूतनीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. मकरंद आबा पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
राहुलबाप्पू देशमुख यांच्या पुढाकारामुळे नायगाव देशमुखच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष कार्यवाही होण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. रस्त्याचे काम लवकर सुरू करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
मेहकर : नायगाव देशमुख ते MDR-45 या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राहुल किशोरबाप्पू देशमुख, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वाखाली गोपाल सुरडकर, राम जाधव व ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
सुमारे 3.800 कि.मी. लांबीचा हा रस्ता अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे तात्काळ नूतनीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. मकरंद आबा पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
राहुलबाप्पू देशमुख यांच्या पुढाकारामुळे नायगाव देशमुखच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष कार्यवाही होण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. रस्त्याचे काम लवकर सुरू करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments