Type Here to Get Search Results !

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा; गायकवाड कुटुंबाकडून देऊळगाव साकर्शातील ७५ शेतकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व!


गणेश पाटील आवाज महाराष्ट्राचा  न्यूज देऊळगाव साकरशा 


सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असून, सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा समोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ॲड. किशोर गायकवाड आणि त्यांच्या पत्नी ॲड. सौ. इतिश्री गायकवाड हे दांपत्य दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहे. समाजात एक नवा आदर्श निर्माण करणारे जिवंत उदाहरण देऊळगाव साकर्शा येथे पाहायला मिळाले आहे. आपले बंधू ॲड. शैलेश शंकर गायकवाड आणि पत्नी 

ॲड. सौ. इतिश्री किशोर गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ॲड किशोर गायकवाड यांच्या कुटुंबाने समाजऋण फेडण्याचा एक कौतुकास्पद निर्णय घेतला. वाढदिवसावर कोणताही अवास्तव किंवा वायफळ खर्च न करता, त्यांनी देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेतील ७५ शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

या अंतर्गत त्यांनी सर्व ७५ विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासह वर्षभराच्या संपूर्ण शैक्षणिक साहित्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या आई श्रीमती सुमनताई यांच्या हस्ते गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले. दुष्काळाच्या आर्थिक संकटामुळे मुलांच्या शिक्षणाची चिंता करणाऱ्या शेतकरी पालकांना यामुळे मदत होईल, यासाठी आम्ही हा खारीचा वाटा उचलत आहोत.निस्वार्थ परोपकारातून समाजाचे ऋण फेडावे आणि गरजवंतांना मदत करावी ही शिकवण व सुसंस्काराची शिदोरी आपल्याला आई वडिलांकडून मिळाली असून, तेच आपले प्रेरणास्थान आहेत अशी भावना यावेळी ॲड  किशोर गायकवाड यांनी व्यक्त केली. 

गायकवाड दांपत्याच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास पाचपोर यांनी समिती, पालक आणि विद्यार्थी यांच्या वतीने दात्यांचे स्वागत,सत्कार करून आभार मानले, कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सरदार सरांनी केले.. यापूर्वी केंद्रप्रमुख विजय मोंढे यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेसाठी मदत करून आनंद मिळवावा. असे आवाहन करून सदर उपक्रम सुरू केला होता त्याद्वारे गावातील अनेक जागरूक व्यक्तींनी शालेय साहित्य वाटप, शाळेला आवश्यक ती मदत करून सदर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमाचे सर्व नियोजन मुख्याध्यापक बावणे सर यांनी केले तर यशस्वीतेसाठी केशेवार सर, देशमुख सर, गिरी सर यांनी प्रयत्न केले.

याप्रसंगी महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.  सदर कार्यक्रमासाठी  डॉ . हेमराज राठी, शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सखाराम आमले, जीवन देशमुख,  ,गणेश पाटील,प्रमोद पाटील रामा ढवळे, सखाराम पाटील ,छोटू देशमुख ,गौरव देशमुख, अण्णा देशमुख,प्रसाद गायकवाड,ओम सोनुने,गोपाल गव्हाळे, गोपाल पाटील,उस्मान भाई, गफ्फार मंत्री,शंकरराव देशमुख,गजानन सोनुने,धनंजय गायकवाड,प्रतीक गायकवाड,हिम्मत पाटील, कावरर्सिंग,सुनील सर, भीमराव वानखेडे,सुधाकर गायकवाड,शकील भाई,भागवत पाटील,गुलाब भाई, राहुल गायकवाड, प्रकाश गुजरे,प्रशांत पाटील,आकाश नवत्रे,भगवान ढवळे,प्रकाश गुजरे, श्रीराम भाऊ काळे, कैलास पवार , भिका भाऊ गायकवाड यांच्यासह अनेक गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments