( निंभोरा बु. येथील एल्गार मेळाव्याला शेतकरी,कष्टकरी,महीलांची तुफान गर्दी)
गणेश पाटीलजळगाव (जा) :- दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी तालुक्यातील मौजे निंबोरा बु. या गावामध्ये शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर साहेब यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भव्य एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या सुरुवातीलाच तरुणांनी गावामध्ये रविकांत तुपकर यांचे जंगी स्वागत करुण गावामधुन वाजत-गाजत मिरवणूक काढली व नंतर मेळ्याला सुरुवात करण्यात आली या मेळाव्याला परीसरातील शेतकरी,शेतमजूर,महीला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झालेल्याचे दिसुन आले.
सदर मेळाव्यामध्ये सोयाबीन-कापसाची दरवाढ २३,२४,२५ चा संपूर्ण पिक विमा,अतीवूष्टीची मदत,शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी,तरुणांची वाढती बेरोजगारी,मायक्रो फायनान्स चा होत असलेला त्रास व इतर काही शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर तुपकरांनी सरकारला धारेवर धरले तसेच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा सुद्धा तुपकरांनी या मेळाव्यातुन दिला.
तसेच युवा आंदोलक अक्षय पाटील व जिल्हाध्यक्ष अमोल राऊत यांनी शेतकऱ्यांवर वारंवार होत असलेला अन्याय व इतर काही विषयांना घेऊन मेळाव्याला संबोधित केले.
याप्रसंगी मेळाव्याला मोठ्या संख्येने आलेल्या सर्व शेतकरी,कष्टकरी,मायबाप जनतेचे युवा तालुकाध्यक्ष अमोल बहादरे व निंभोरा बु. येथील ग्रामस्थांनी लोकांचे आभार मानले व राष्ट्रगीताने मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

Post a Comment
0 Comments