*(सेवा कर्म हेच सर्वश्रेष्ठ_ स्वामी *हरिचैतन्यजी महाराज)* . ( स्व शंकरराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देऊळगाव साकरशा येथे भव्य आरोग्य शिबिर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न). . गणेश पाटील देऊळगांव साकरशा येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी मेहकर मतदारसंघातील मौजे देऊळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्व.शंकरराव गायकवाड बहुउदेशिय संस्था बुलढाणा चे अध्यक्ष अॅड.किशोर गायकवाड आणि उपाध्यक्ष अॅड.शैलेश गायकवाड यांच्या वतीने स्व.शंकरराव गायकवाड यांच्या स्मृती पित्यर्थ भव्य आरोग्य शिबीर आणि रुग्णवाहिका चे लोकार्पण केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी यावेळी आमदार प्रतापरावजी जाधव केंद्रीय मंत्री आरोग्य व आयुष्य राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार यांनी यावेळी सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करीत असताना सांगितले की भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात असून त्या योजनाचा सामान्य नागरिकांना माहिती नसल्याने त्यांचे आरोग्याचे व आर्थिक नुकसान होत आहे तरी जागरूक नागरिकांनी सतर्क होऊन रुग्णसेवेमध्ये सहभाग घेऊन सहभाग घेऊन इतरांना इतरांना मार्गदर्शन करून माझ्याशी व माझे कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विविध योजना व आरोग्य संबंधित कुठल्याही समस्येचा तक्रारी लाभ घ्यावा यावेळी परमपूज्य हरिचैतन्यजी महाराज यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे विधिवत पूजन करण्यात आले व तसेच त्यांनी यावेळेस उपस्थित त्यांना प्रवचन ना मधून मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की सेवा ही सर्वश्रेष्ठ असून सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन मी सतत सेवा करीत आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णसेवा ही सर्वात महत्त्वाची सेवा असून गायकवाड कुटुंबाच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन करतो असे सांगितले यावेळी आरोग्य शिबिरामध्ये सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचा तसेच नर्सेस अशा सेविका व विविध कर्मचारी यांचा नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंचकावर ऍडव्होकेट शैलेश गायकवाड एडवोकेट किशोर भाऊ गायकवाड दीपक गायकवाड व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते
व तसेच , शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.समाधान साबळे,जी प सदस्य तेजराव जाधवजेष्ठ नेते श्री. मोतीचंद राठोड श्री. मारोतराव धांडे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते आणि गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकेश परिहार डॉक्टर राजेंद्र सोडतकर नेत्रचिकित्सक डॉक्टर ज्ञानेश्वर गाडेकर डॉक्टर सतीश शिरसागर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर व प्राथमिक आरोग्यदायी सर्व कर्मचारी तसेच आरोग्य सेविका आरोग्य सेवक व आशा सेविका आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते यावेळी जवळपास दोन हजार रुग्णांनी रुग्नेसेवेचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी करता स्वर्गीय शंकरराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच लक्ष्मी अर्बन संस्थेचे पदाधिकारी तसेच एडवोकेट शैलेश भाऊ गायकवाड किशोर भाऊ गायकवाड यांच्या मित्रमंडळींनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन ओम सोनूने यांनी केले

Post a Comment
0 Comments