Type Here to Get Search Results !

देऊळगाव साकरशा जि प सर्कल मध्ये महिला राज. (जिल्हा परिषदेला अध्यक्षपद देणारे सर्कल म्हणूनपरिचित

orgniol sizhe
      देऊळगाव साकरशा (गणेश पाटील) मिनी मंत्रालय असलेल्या बुलढाणा पूर्वीचे घाट बोरी व पुनर्रचनेमध्ये देऊळगाव साकरशा सर्कल म्हणून निर्माण झालेले हे सर्कल जिल्हा परिषदेला अध्यक्ष पद लाल दिवा देणारे सर्कल म्हणून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये परिचित आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण निघाले असल्याने व देऊळगाव साखरशा जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण महिला करिता राखीव निघाल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला लाल दिवा देणार की काय अशी चर्चा मतदारांमध्ये होत आहे तसेच देऊळगाव साकरशा पंचायत समिती सर्कल सुद्धा इतर मागास प्रवर्गातील महिलाकरिता राखीव निघाल्याने सदर सर्कल मध्ये महिलाराज येणार आहे जिल्ह्यातील अति दुर्गम व ग्रामीण भागात वसलेले सर्कल सदर सर्कलचा इतिहास पाहता गोडबोरी सर्कलची निर्मिती झाली तेव्हापासून सुरुवातीच्या काळामध्ये या सर्कलवर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित होते त्यावेळी काँग्रेसच्या आशाताई देशमुख या संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा परिषदेवर अविरोध म्हणून निवडून गेल्या होत्या त्यानंतर हे सर्कल सातत्याने अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर लिलाबाई लेकुरवाळे ह्या विजय झाल्या नंतरच्या काळात अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानंतर नवखा चेहरा घरी कुटुंबातील युवकांमध्ये प्रसिद्ध असलेले भास्कर ठाकरे विजयी झाले त्यांच्या रूपाने बुलढाणा जिल्हा परिषदेला या सर्कलच्या माध्यमातून अध्यक्ष पदाचा मला लाल दिव्याच्या बहुमान मिळाला यानंतर 2006 ला सदर सर्कल ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. सदर सर्कलवर विद्यमान खासदार व सध्याचे केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेने काँग्रेसचा गड काबीज करीत प्रथमच सुनीता गणेश आडे ह्या विजयी झाल्या व शिवसेनेने आपला भगवा झेंडा येथे फडकवला यानंतर सदर सर्कल अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसच्या अलका चित्रांगण खंडारे शिवसेनेच्या उषा बाळू वानखडे यांच्यापेक्षा 121 मते घेऊन विजयी झाल्या व दुसऱ्यांदा त्यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद व लाल दिवा या सर्कला मिळाला मागील निवडणुकीमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेजराव जाधव यांनी काँग्रेसचे विष्णुपंत पाखरे यांचा पराभव करीत पुन्हा या सर्कलवर शिवसेनेचा भगवा फडकला यावेळी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे सर्कल सर्वसाधारण महिला करता राखीव झाल्याने व जिल्हा परिषद अध्यक्ष पद सर्वसाधारण असल्याने पुन्हा एकदा या सर्कलच्या रूपाने अध्यक्ष पद व लाल दिवा देऊळगाव साकरशा जिल्हा परिषद सर्कलला मिळू शकतो म्हणून इच्छुकाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून सदर सर्कल मधून  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे यांच्या पत्नी सौ लताताई भास्कर ठाकरे शिवसेना शिंदे गटाकडून जिजा ताई चांदेकर राठोड जिल्हा संघटक महिला आघाडी या इच्छुक असल्याचे दिसत आहे सौ अन्नपूर्णा भगवान जाधव सर रजनीताई गजानन धामणकर यांच्याकडून सुद्धा मोर्चे बांधव सुरू असल्याचे दिसत आहे

Post a Comment

0 Comments