*गणेश पाटील* बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकरशा येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव साखरशा येथे सकाळी दहा ते चार पर्यंत देऊळगाव साकरशा येथील स्वर्गीय शंकरराव गायकवाड यांच्या स्मृतिपित्यर्थ भव्य आरोग्य शिबिर व रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे रुग्णवाहिकेचे पूजन व प्रवचन हरि चैतन्य महाराज गुरुदेव सेवा आश्रम पळसखेड सपकाळ यांच्या शुभहस्ते होणार असून रुग्णवाहिकेचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या शुभ असते होणार आहे यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर दत्तात्रय बिराजदार जिल्हा शिल्लक चिकित्सक बुलढाणा यांची उपस्थिती राहणार आहे सदर रुग्णवाहिका व सदर आरोग्य शिबिराचे आयोजन स्वर्गीय शंकरराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे मुले अँड किशोर गायकवाड अँड शैलेश भाऊ गायकवाड व स्वर्गीय शंकरराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था बुलढाणा वतीने आणि लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा यांच्या मार्फत करण्यात आले आहे सदर शिबिरामध्ये डॉक्टर अनंता मगर सर्जन डॉक्टर गीता शेळके स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुरेश गिऱ्हे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अक्षय राठी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर योगिता शेजोळ बालरोग तज्ञ डॉक्टर धनंजय सातपुते अस्थिरोग तज्ञ डॉक्टर स्नेहा गायकवाड डॉक्टर लक्ष्मीकांत क्षीरसागर स्त्री रोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र सवडतकर नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अनिल कुमार गाभने मेडिसिन डॉक्टर महेश ओव्हर मेडिसिन डॉक्टर अंकुश राठी एमडी मेडिसिन डॉक्टर गट्टानी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर योगेश चव्हाण बालरोगतज्ञ डॉक्टर मिनल शिरसागर स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मंदार वाघमारे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सतीश शिरसागर नेत्र चिकित्सक डॉक्टर शैलेश पळसकर मेडिसिन डॉक्टर हेमराज राठी डॉक्टर धनंजय राठी डॉक्टर अमोल पाचपवार डॉक्टर संजय ढवळे यांच्यासह नामांकित डॉक्टर रुग्णाची विविध तपासण्या करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच सदर कार्यक्रमाचे कार्यवाह संपूर्ण देऊळगाव साकरशा वासी राहणार आहेत

Post a Comment
0 Comments