*BIG BREKING*. *आज मतदान मात्र गुलाल उधळण्याची पहावी लागेल वाट*.
December 02, 2025
0
*आज मतदान मात्र गुलाल उधळण्याची पहावी लागेल वाट*. *उमेदवारांचा जीव टांगणीला मतमोजणी आता उद्या येवजी 21 डिसेंबर रोजी होणार हायकोर्टाचा निर्णय तोपर्यंत उमेदवार आणि मतदारांना पहावी लागेल वाट* मुंबई (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या असतानाच दररोज नवनवीन आदेश नवीन नवनवीन निर्णयामुळे अनेक नवीन बदल होत असल्याचे पहिल्यांदाच पहावयास मिळत आहेत आज रोजी राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासह तसेच सदस्य पदाच्या निवडणुकीकरिता मतदान होत असताना उद्या मतमोजणी होणार असे निवडणूक विभागामार्फत जाहीर झालेले असतानाच आज दिनांक 2 डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानानंतरच 21 डिसेंबर रोजी राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदाच्या मतमोजणी होणार आहे त्यामुळे नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाकरिता व सदस्य पदाकरिता उमेदवार म्हणून उभे असलेल्या उमेदवारांच्या झोपा आणखीन काही दिवस उडणार आहेत परिणामी उमेदवारांचा जीव टांगणीला लागल्याचे पहावयास मिळत आहे

Post a Comment
0 Comments