प्रतिनिधी (मुंबई) राज्यातील होऊ घातलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकां करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांना पारंपारिक रित्या ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्धी दिलेल्या परिपत्रकानुसार राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण केले आहे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते आयोगाचे सचिव सुरेश काकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते ऑफलाइन पारंपारिक पद्धतीने पारंपारिक पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याकरिता नियोजन केले असून त्यामध्ये 29 महानगरपालिका 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्याचे नियोजन केले आहे तसेच निवडणूक आयोगाने त्यांचे संकेत व मताधिकार ॲप विकसित केले आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली आहे

Post a Comment
0 Comments