Type Here to Get Search Results !

*बुलढाणा जिल्ह्यातील. तरुण शेतकऱ्याची आत्महत्या*?"

(मेहकर व लोणार तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले पिके आर्थिक विवेचनातून घेतले टोकाचे  पाऊल).                                                               


बुलढाण (प्रतिनिधी). लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील जवळ असलेल्या भानापूर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरुबा आव्हाळे(वय 35 वर्ष) यांनी कर्जबाजारीपणामुळे व आर्थिक विवेचनेतून कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करून  हृदय द्रावक घटना घडली या घटनेमुळे भानापूर गावा सह परिसरातील गावांमध्ये शोककाळा पसरली आहे सदर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे अर्जुन आव्हाळे यांच्याकडे 58 गुंठे शेतीअसून यावर्षी मेहकर लोणार तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक नष्ट झाले होते यामुळे बँक कर्जासह व वैयक्तिक उसणवारीच्या कर्जामुळे तसेच सदर कर्जाची परतफेड न करू शकल्याने काही दिवसापासून मानसिक तणावांमध्ये होते दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावात लगत असलेल्या स्वतःच्या शेतामध्ये असलेल्या गोठ्यामध्ये विषारी औषध प्राशन केले ही बाब लक्षात येताच नातेवाईक यांनी तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री आठ वाजता च्या दरम्यान त्याचा दुर्दैव मृत्यू झाला अर्जुन कचरूबा. आव्हाळे यांच्या पश्चात पत्नी आई व एक लहान मुलगा आणि एक भाऊ असा आप्त परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्याने व तसेच एका लहान मुलाचे डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने गावकऱ्या मध्ये हळहळ व्यक्त होत आहे शासनान आता तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी साठी जाहीर झालेली मदत त्वरित जमा करावी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला त्वरित भरघोस मदत द्यावी जेणेकरून भविष्यामध्ये कुठलाही शेतकरी किंवा तरुण शेतकरी शेतकरी महिला आत्महत्या करणार नाही

Post a Comment

0 Comments