Type Here to Get Search Results !

*देऊळगाव साकरशा येथील श्री सरस्वती विद्यालयामध्ये बहरले 96-97 वर्ग मित्राचे स्नेहमिलन*


 *(सरस्वती विद्यालयाला दिल्या तब्बल 50 हजाराच्या भेटवस्तू )*

*गणेश पाटील श्री सरस्वती विद्यालय दे साकर्शा येथे विद्यालयाच्या 1996-97 इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलनाचा कार्यक्रम अत्यंत विलोभनीय वातावरणात पार पडला.तब्बल अठ्ठावीस वर्षांनी आपल्या शाळेच्या परिसरात आल्यावर माजी विद्यार्थी भावनिक झाले.ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्याला आकार दिला त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला भावनिक किनार लाभली.अनेक वर्षांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाहून सर्व शिक्षकांना आनंद झाला.आयोजित कार्यक्रमात शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांच्या या भावनिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.विद्यार्थी मनोगत व्यक्त करत असताना वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.याप्रसंगी आपल्या शाळेप्रती ऋण व्यक्त करतांना माजी विद्यार्थ्यांनी शाळेला तब्बल 50हजार रुपयांच्या वस्तू शाळेला भेट देऊन एक आदर्श उदाहरण सादर केले.भेटवस्तूंमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना सुलभता यावी यासाठी प्रोजेक्टर पोडियम व एक स्क्रीन भेट म्हणून दिली.ग्रामीण भागातील विद्यार्थी व आपली शाळा शहरी विद्यार्थ्यांच्या व शाळांच्या स्पर्धेत यामुळे कुठेच मागे राहणार नाही अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.ह्या भेटवस्तूंचा सहृदय स्वीकार करतांना विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री धामोडकर सर यांनी हा उपक्रम सामाजिक भानाचे एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण असून याचे वर्णन शब्दातीत असल्याची भावना व्यक्त करत आभार मानले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आदर्श माजी शिक्षक श्री पाचपवर सर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री निंबाळकर सर,श्री ताजने सर,श्री गवई सर,श्री रमेश निकस सर,श्री माळी सर ,श्री वानखडे सर उपस्थित होते.यावेळी शाळेचे विद्यार्थी जिल्हा परिषद सदस्य तेजराव जाधव उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाचपवार सर स्वागत सुनील राठोड यांनी केले तसेच माजी प्राचार्य हरिओम गवई यांचे स्वागत सुरेंद्र कटारे यांनी केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी समयोचित मनोगते झाली.संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध आठवणींना उजाळा दिला.सकाळी नाश्ता व सायंकाळी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पवार प्रास्ताविक व आभार सुनील पाचपोर तर मनोगतांमध्ये विलास राठोड अनिल चव्हाण विष्णू कवडे मनीषा सानप शे महेबूब कुरेशी सुशील पवार विलास साखरकर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.*इवो

Post a Comment

0 Comments