*गणेश पाटील* देऊळगाव साकरशा. स्थानिक श्री सरस्वती विद्यालय देऊळगाव साकर्षा येथे वर्ग 10 च्या स्काऊट गाईडच्या वतीने खरी कमाईचे आयोजन करण्यात आले.. तसेच विद्यालयातील माजी विद्यार्थी, निवृत्त सुभेदार श्री महादेव भाऊ धानोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हा उद्देश समोर ठेऊन विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी विविध पदार्थाचा यथेच्छ आस्वाद घेतला. तसेच नुकतेच सेवा निवृत्त झालेले सुभेदार श्री महादेव भाऊ धानोरे यांचा विद्यायाच्या वतीने सत्कार कारण्यात आला. वर्ग 10 चे विद्यार्थी व वर्ग शिक्षक श्री पाचपोर सर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच या कार्यक्रमासाठी श्री सरस्वती शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री रतन भाऊ दुगड, सदस्य, श्री गोपाल भाऊ लाड, रितेश भाऊ दुगड , प्राचार्य श्री धामोडकर सर, श्री मुंढे सर, पाटील सर, नगरनाईक सर, चवरे सर, गाडेकर सर, चांदणे सर, धोटे मॅडम, मेटांगळे मॅडम, साळुबा फोलाने, सुमित चव्हाण, संतोष मुरडकर उपस्थित होते..

Post a Comment
0 Comments