देऊळगाव साखरशा | प्रतिनिधी
देऊळगाव साखरशा येथे आर.आर. फाउंडेशनच्या वतीने राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आर.आर. फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. रंजनाताई चव्हाण-राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शितल कलेक्शन, आर.आर. कॉम्प्लेक्स येथे आयोजित या कार्यक्रमात राजमाता जिजाऊंच्या कार्याचा जयघोष करण्यात आला.
या प्रसंगी रंजनाताई चव्हाण यांनी लहान मुली, मुले व महिलांना राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्व, समाजसेवेतील योगदान व राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या थोर स्त्रियांच्या विचारांमधून प्रत्येक महिलेला प्रेरणा मिळते. योग्य संस्कार, मार्गदर्शन आणि कर्तव्याची जाणीव करून दिल्यास प्रत्येक स्त्री समाजासाठी शूरवीर घडवू शकते.
आर.आर. फाउंडेशन नेहमीच गोरगरिबांना मदत, महिलांना आधार, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. थोर समाजसुधारकांच्या जयंती व पुण्यतिथी साजऱ्या करून समाजप्रबोधनाचे कार्य केले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मकर संक्रांतीनिमित्त लहान मुलांना तिळगुळ वाटप करण्यात आले तसेच कागदापासून तयार केलेले पतंग देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला बळीराम राठोड, राम चव्हाण, शितल चव्हाण, कृष्णा चव्हाण, शशिकलाबाई राठोड, वैष्णवी राठोड, सृष्टी राठोड, सुजल चव्हाण, अलका राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन बळीराम राठोड यांनी केले.
.png)
Post a Comment
0 Comments