Type Here to Get Search Results !

**प्रा. डॉ. वसंत हंकारे यांनी उलगडलेल्या माय -बापानी अश्रूचे बंध फुटले*

 जानेफळ



( नवल राठोड/गणेश पाटील). हंबरडा हंबरडा फोडत मुलींनी बापांना कवटाळले..........

***आयोजक सा. कार्यकर्ते मोहन धोटे, संचालक संतोषराव तोंडे आणि सरस्वती परिवाराचे भरभरून कौतुक..........

कृष्णा हावरे 

बुलढाणा......... संपादक 

आई आणि बाप आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतात, आई 9महिने 9दिवस प्रसव वेदना सहन करून आपल्याला जन्म देते. आपल्यामुळे जर त्यांना खाली मान घालावी लागत असेल तर आपले जगणे व्यर्थ आहे. आई वडिलांना समजून घ्या. त्यांना प्रेमाने मिठी मारा. आपल्याला सर्व ब्रँडेड सोई देणारा बाप फाटके बनियान घालतो. त्याला झोपल्यानंतर बघा. तो कुणासमोर रडत नाही कारण त्याला सर्वच सांभाळून घ्यायचे असते. त्या बापाला समजून घ्या असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते डॉ. वसंत हंकारे यांनी मांडले. ते सरस्वती परिवार, जानेफळ येथे आयोजित स्व. तोंडे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानात बोलत होते.अंबिका महिला अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन जीवनराव धोटे,संचालक संतोषराव तोंडे व सरस्वती परिवार जानेफळ दे. साखरशा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई शरदअप्पा मिटकरी, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वसंत हंकारे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सत्यजित परिवाराचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, मा परमेश्वर क्षीरसागर उपशिक्षण अधिकारी (मा.)बुलढाणा,रुपालीताई वडणकर, सरपंच जानेफळ,गजाननतात्या कृपाळ मा. सरपंच, मा. डॉ. धनराज राठी अध्यक्ष, अष्टविनायक परिवार जानेफळ, माधवराव आरसोडे जिजामाता परिवार, ही. खुर्द,मा. कैलासभाऊ पैठणकर अध्यक्ष, श्री शिवाजी शी. सं. हिवरा खुर्द,गणेशराव करवंदे मा. उप. कार्य अभियंता,चंदू काका गट्टाणी  समन्वय समिती अध्यक्ष,रामजी सपकाळ अधीक्षक सत्र न्यायालय, बुलढाणा, राजुभाऊ रहाटे अध्यक्ष आ. पा. पाटील संस्था शेंदला, संतोषराव डोमळे अध्यक्ष मा. ए. सो. घाटबोरी व दिनूभाऊ मिटकरी शाळा समिती अध्यक्ष हे उपस्थित होते. मुलींचे लेझीम पथकासह वाजतगाजत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

 सुरवातील महापुरुषांच्या  प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्यामभाऊ गट्टाणी यांनी केले. स्व. तोंडे गुरुजी यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वावर त्यांनी प्रकाश टाकला.

 त्यानंतर श्यामभाऊ उमाळकर यांनी अनेक उदाहरणे देत प्रेक्षकांची मने जिंकली. गजाननतात्या कृपाळ व उपशिक्षणाधिकारी क्षीरसागर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सौ. शैला धाबे व ऍड. क्षीरसागर यांच्या ध्वनीफीत एकविण्यात आल्या.

 त्यानंतर प्रा. डॉ. म्हस्के यांनी वक्त्यांना स्वलिखित पुस्तके भेट दिली. वरिष्ठ लिपिक बसवेश्वर आखाडे यांचा राज्यावर प्रतिनिधित्व करण्यासाठी क्रमांक लागल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

मुख्य वक्ते प्रा. डॉ. हंकारे यांनी व्याख्यानाची सुरुवात हलक्या फुलक्या विनोदांनी करत, हळूहळू त्यांनी सर्व श्रोत्यांच्या मनावर ताबा मिळवला. आपल्या धारदार शब्दातून आणि अमोघ वाणीतून त्यांनी आई-वडील सांगायला सुरुवात केली व पाहता पाहता श्रोत्यांच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. अनेक मुलींनी तर हंबरडा फोडला, आईबाप आपल्यासाठी जीवाचं रान करतात आणि आपण त्यांना पोलीस स्टेशनमध्ये उभे करून त्यांचा अपमान करतो. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत त्याला जीव लावा, एकदा आईबाप निघून गेले की जगात कोणीच कोणाचं नसते. कोरडी आणि शुष्क झालेली नाती तुमच्याकडे असलेल्या पैशामुळे तुमच्या जवळ येऊ शकतात. तुमच्यावर खरं प्रेम करू शकत नाहीत म्हणून आई-वडिलांना समजून घ्या. शेवटी हंबरडा फोडत अनेक मुलींनी आपल्या वडिलांना मिठी मारली. Sarv श्रोते भावनिक झाले होते. अशा या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल  त्यांनी मोहन धोटे पाटील, डॉ. कृष्णा हावरे, संतोषराव तोंडे, संचालक मंडळ व सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.

त्यानंतर जानेफळ, देऊळगाव साखरशा, 

हिवरा खुर्द येथील 10 शाळांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने पल्स ऑक्सिमीटरचे वाटप

अमर राऊत जिल्हा कार्यकारिणी सदस्य इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे तर आभार प्रदर्शन संस्थेचे कोषाध्यक्ष श्यामभाऊ मुंदडा यांनी केले.

 येणाऱ्या सर्व पालकांसाठी  व विद्यार्थ्यांसाठी सरस्वती शिक्षण समितीच्या वतीने नाश्त्याची व्यवस्था केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

मोहन धोटे पाटील यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणिवे बद्दल सुज्ञ नागरिकांमध्ये मोठी चर्चा होती.

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती परिवार जानेफळ, दे. साखरशा येथील  प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लिप प्रत्येकाच्या स्टेटसला दिसत होत्या एवढे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments