Type Here to Get Search Results !

*देऊळगाव साकरशा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन अल्हाट यांचे निधन.*


  देऊळगाव साकरशा (प्रतिनिधी.)                                        येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पक्षाचे नेते आयुष्यभर सामाजिक कार्यात तसेच धार्मिक विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असणारे गजानन सूर्यभान अल्हाट यांचे वयाच्या 58व्या वर्षी दिनांक12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी चार वाजेच्या दरम्यान दुखद असे निधन झाले त्यांच्या निधनाने अल्हाट परिवारावर तसेच देऊळगाव साकरशा गावावर शोककळा  पसरली त्यांच्या पश्चात एक भाऊ तीन मुले पत्नी व नातवंड असा बराच मोठा परिवार आहे गजानन अल्हाट हे जगदंबा मातेचे उपासक होते दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये ते नवरती  म्हणून नऊ दिवस देवीची उपासना करीत होते तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एक वाजता मुक्तिधाम देऊळगाव साकरशा येथे पार पडला यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर जिल्हा परिषद सदस्य तेजराव जाधव एडवोकेट शैलेश भाऊ गायकवाड मोतीचंद राठोड तसेच विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक कार्यातील कार्यकर्ते व गावातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments