Type Here to Get Search Results !

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम याचे नामकरण झाले संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम*


मुंबई (गणेश पाटील). महाराष्ट्र राज्य सरकारने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाजातील विविध नेत्याच्या माध्यमातून तसेच विविध संघटनेच्या माध्यमातून मागणी केल्यानुसार राज्यातील वाशिम येथे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याचे नामकरण संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम असे नामकरण करण्याचे अध्यादेश दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आला सदरचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आला त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम ऐवजी आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले आहे सदर वैद्यकीय शासकीय महाविद्यालय हे दिनांक 14 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार 100 विद्यार्थी क्षमतेचे व तसेच सलग्नित 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच परिसरातील आदिवासी व बंजारा समाजातील नागरिकांच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्याकरिता महत्वपूर्ण असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्फत वैद्यकीय शिक्षणासोबतच सर्वसामान्य जनतेस दुय्यम व तृतीय आरोग्य सेवा सदर महाविद्यालय पुरवीत आहे सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामाधिकरण करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच व सामाजिक संघटना कडून शासनाकडे निवेदन प्राप्त झाले होते त्यानुसार संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे आराध्य दैवत महान समाज सुधारक म्हणून ओळखले जातात त्यांनी सामाजिक समता नैतिक आचार व्यसनमुक्ती परिश्रम व स्वावलंबन व आदी मूल्यांचा प्रचार व प्रसार केला त्यांच्या या कार्यामुळे समाजामध्ये सामाजिक जागृती स्वाभिमान व सदाचाराला चालना मिळाली त्यांच्या या विचाराचा व्यापक प्रभाव आजही मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये दिसून येत आहे त्याच अनुषंगाने शासन स्तरावर विचारून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम यांचे नामाधिकरण करण्याची शासन स्तरावर विचाराधीन होती त्यानुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याचे नामकरण संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम असे करण्यात आले आहे या निर्णयाच्या बंजारा बांधवांच्या वतीने  स्वागत केले जात आहे

Post a Comment

0 Comments