गणेश पाटील देऊळगाव साकरशा *मंजिले ऊन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है युही पंख होने से कुछ नही होता हसलो से उडान होती है* शाळेचे ऋण.. ज्या शाळेत सुनील पाचपोर शिकले त्याच शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झाली. आपल्या गावचे आणि श्री सरस्वती शिक्षण समितीचे ऋण कसे फेडता येईल यासाठी ते शाळेत विविध उपक्रम घेत असतात व आपला विद्यार्थी सर्वगुण संपन्न आणि स्वावलंबी व्हावा यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात.. आपल्या विद्यार्थी दशेत ते कलाशिक्षक श्री निंबाळकर सर व पितृतुल्य, शिस्तप्रिय शिक्षक श्री पाचपवार सर यांना ते आपले आदर्श मानतात. या शिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावर ते चालण्याचा प्रयत्न करतात.
क्रिकेट नेट.. ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर जावी यासाठी पाचपोर सरांनी 40,000 रुपये स्वतः खर्च करून टेनिस तसेच लेदर क्रिकेटचा सराव व्हावा यासाठी क्रिकेटचे नेट तयार केले.. त्यांच्या कारकिर्दीमध्ये एखादा तरी विध्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा, तसेच शाळेचे आणि गावाचे नाव मोठे करावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत...
शैक्षणिक कार्य- प्रत्येक वर्षी इयत्ता दहावी मधील एका विद्यार्थ्यांला दत्तक घेऊन त्याची परीक्षा फी, पुस्तके, गणवेश देतात.. तसेच वडिलांच्या स्मृती पित्यर्थ स्व. भीमराव संभाजी पाचपोर पारितोषिक, वर्ग 10 मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास हे बक्षीस देण्यात येते.
सामाजिक कार्य- श्रावण महिन्यामध्ये निघणाऱ्या कावडधारी यांना त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येते. तसेच नवरात्र उत्सव, गणपती उत्सव, भंडारा तसेच महान पुरुषांच्या जयंती तथा पुण्यतिथी निमित्त त्यांचा सहभाग असतो.
क्रीडा क्षेत्र - 2022 ला पोखरा नेपाळ येथे भारत, श्रीलंका नेपाळ, बांगलादेश या देशा दरम्यान झालेल्या पहिल्या एशियन टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियन शिप मध्ये श्री सुनील पाचपोर यांनी भारताचे नेतृत्व केलं तसेच या स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला.. त्यांचे ही निवड नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय तसेच भुवनेश्वर ओडीसा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या कामगिरीमुळे त्यांची भारतीय संघात निवड झाली होती. त्यांच्या या यशाबद्दल त्या वेळचे क्रीडामंत्री आदरणीय सुनीलजी केदारे, मराठा सेवा संघाचे संस्थापक आ. पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी त्यांचे पुस्तक शून्याचा शोध देऊन सत्कार केला. तसेच श्री सरस्वती शिक्षण समितीच्या अध्यक्षल श्रीमती विजयाताई मिटकरी, उपाध्यक्ष श्री रतन भाऊ दुगड, संस्थेतील विविध मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सन्मान केला. तसेच देऊळगाव साकर्षा नगरीचे सरपंच श्री संदीप भाऊ अल्हाट,आ. भैय्यासाहेब देशमुख, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हाअध्यक्ष, श्री प्रमोद बाप्पू देशमुख,गावातील प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवार आणि क्रिकेट प्रेमी तसेच गावकऱ्यांनी ढोल आणि ताशा च्या गजरात त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढली.
अटाळी येथे झालेल्या पहिल्या एपीएल सीझन मध्ये सुनील पाचपोर सर यांच्या नेतृत्वामध्ये एलसीसी पावर हीटर या संघाने चषकासह पहिले बक्षीस मिळवले. त्यांनी देऊळगाव साखरशाच्या क्रिकेटला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.
शेतीची आवड.. शाळेसोबतच त्यांना शेतीची सुद्धा आवड आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये 700 केशर आंब्याची झाडे , सिताफळ, साग, अंजीर, आवळा,जांभूळ, रामफळ, पेरू, चिकू इत्यादी फळ झाडे लावली..
मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं तसेच त्या शिक्षणाला आधुनिकतेची जोड असावी म्हणून गेल्या वर्षी त्यांच्या वर्ग 10 च्या बॅचने शाळेला 50 हजार रुपयाच्या वस्तू भेट दिल्या. त्यामध्ये इलेक्ट्रिक पोडियम आणि ओव्हरहेड प्रोजेक्टर भेट स्वरूपात दिले...
भारत सरकारची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशनच्या क्रिकेट बुलडाणाचे जिल्हाध्यक्ष तसेच खो-खो चे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांची निवड झाली होती. आता स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे ते सदस्य आहेत.
प्रेरणास्थान.. श्री पाचपोर सर यांचे नातेवाईक बुलढाणा येथील सुप्रसिद्ध डॉ. हिंगणे यांच्या हिंगणे हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचे प्रेरणास्थान असलेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री रविंद्र कोल्हे आणि सौ स्मिता कोल्हे यांच्याशी त्यांचा संवाद झाला. त्या संवादामध्ये एवढं मोठ उतुंग व्यक्तिमत्व असणारे, कीती साधे राहतात. त्यांचा तो साधेपणा त्यांच्या मनाला भावला तेव्हापासून ते त्यांना आपले आदर्श मानतात सुनील पाटील सर यांचे शिक्षण MA English MA Political Since सुनील सर यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा व त्यांच्यासाठी *उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी*



Post a Comment
0 Comments