गणेश पाटील आवाज महाराष्ट्रात न्यूज नेटवर्क
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीतील संपूर्ण वाढीव वेतन संघटनेला निधी स्वरूपात देण्याचा पाचपोर कुटुंबीयांचा निर्धार
महाराष्ट्र एसटी कामगार सेना या संघटनेप्रती असलेली निष्ठा, कृतज्ञता, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून माननीय श्री. संदीप पाचपोर, वाहतूक नियंत्रक, खामगाव आगार तथा मा. विभागीय अध्यक्ष, बुलढाणा विभाग यांचा निर्णय सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये माननीय परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांनी रा.प. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता दरातील वाढीची घोषणा केली. त्यानुसार संबंधित परिपत्रक व सूचनांप्रमाणे ही वाढ जुलै २०२६ देय व ऑगस्ट २०२६ मध्ये अदा होणाऱ्या वेतनात लागू करण्यात आली आहे.
मात्र, ही वेतनवाढ कर्मचाऱ्यांना सहजासहजी किंवा एका दिवसात मिळालेली नसून, त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कर्मचारी हितासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष मा. खा . अरविंदजी सावंत, सरचिटणीस मा. श्री. हिरेनजी रेडकर व कार्याध्यक्ष मा. प्रदीपजी धुरंदर यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करून शासन व प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा केला आहे.
संघटनेच्या या प्रयत्नांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वेळ, श्रम तसेच अनेकदा आर्थिक खर्चही होत असतो. कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने उभी राहते, याची जाणीव ठेवून संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून श्री. संदीप पाचपोर व पाचपोर कुटुंबीयांनी जुलै २०२६ देय असलेल्या ऑगस्ट २०२६ च्या वेतनातील वाढीव संपूर्ण रक्कम संघटनेला निधी स्वरूपात देण्याचा निर्धार केला आहे.
हा निर्णय केवळ आर्थिक योगदान नसून, ‘ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक छोटीशी परतफेड’ या भावनेतून घेतलेला आहे. कर्मचारी हित, संघटनात्मक बांधिलकी आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या निर्णयातून पाहायला मिळतो.
कोरोना काळातही पाचपोर कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी
यापूर्वीदेखील कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीसाठी आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाचपोर कुटुंबीयांनी ₹१०,०००/- ची आर्थिक मदत केली होती.
त्यामुळे संघटनेप्रती असलेली निष्ठा असो अथवा सामाजिक बांधिलकी—पाचपोर कुटुंबीयांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून ती अधोरेखित केली आहे.
संघटनेने केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून आपल्या हक्कातून मिळालेल्या वाढीव वेतनातील रक्कम पुन्हा संघटनेच्या कार्यासाठी देण्याचा निर्णय हा निश्चितच अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.
“कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वतःच्या मिळकतीतून योगदान देणे, हीच खरी संघटनात्मक निष्ठा!”
असा आदर्श निर्माण करणाऱ्या श्री. संदीप पाचपोर व पाचपोर कुटुंबीयांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments