Type Here to Get Search Results !

*श्री सरस्वती कनिष्ठ कला महाविद्यालय विद्यार्थी सर्व स्तरातून अव्वल*


आवाज महाराष्ट्राचा न्यूज



देऊळगाव साकर्शा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इयत्ता ७ वी) मध्ये श्री सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, देऊळगाव साकर्शा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयातील कु. गुंजन सुनील राठोड, प्रबुद्ध मंगल वानखडे आणि कु. श्रद्धा सत्यपाल वाडेकर हे विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत.

यामध्ये कु. गुंजन सुनील राठोड हिने VJ प्रवर्गातून  प्रबुद्ध मंगल वानखडे याने SC प्रवर्गातून, तर कु. श्रद्धा सत्यपाल वाडेकर हिने SC प्रवर्गातून  मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला.

या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक श्री. सुनील राठोड, श्री. सत्यपाल वाडेकर, श्री. मंगलभाऊ वानखडे तसेच पत्रकार गणेश पाचपोर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात प्राचार्य जाधव सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच कार्यक्रमात विद्यालयाचे कर्तव्यदक्ष शिपाई रतनदादा पवार यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रा. डॉ. मुंढे सर, चांदोरे सर, पाचपोर सर, नगरनाईक सर, गाडेकर सर, धिरज पाटील सर, धोटे मॅडम, शेळके मॅडम, वानखडे सर, चांदणे सर आणि सुमित चव्हाण सर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पुरुषोत्तम चवरे यांनी केले.

विद्यालयाच्या या यशाबद्दल श्री सरस्वती शिक्षण समिती, जानेफळच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments