आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
सुनील पाचपोर सरांचे कार्य केवळ शाळेच्या चार भिंतींपुरते मर्यादित नाही.दरवर्षी दहावीच्या वर्गातील निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांची पूर्ण पालकत्वाची जबाबदारी ते स्वतः स्वीकारतात. त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर ते स्वतःच्या खिशातून खर्च करतात.
आई-वडिलांचे छत्र नसलेल्या किंवा आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात.“बच्चों को सिर्फ पढ़ाना नहीं, बल्कि उनके सपनों को पूरा करने के लिए उनके साथ खड़ा होना ही सच्ची शिक्षा है.”सरांचा विद्यार्थ्यांप्रती असलेला हा जिव्हाळा त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो. एखाद्या विद्यार्थ्याला केवळ पुस्तक देणे सोपे आहे, पण त्याच्या अडचणी समजून घेऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, ही खऱ्या माणुसकीची ओळख आहे.“जिस बच्चे के सिर पर माता-पिता का साया नहीं, उसके सिर पर शिक्षक का हाथ होना ही सबसे बड़ी ताकत है.”ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी परिस्थितीशी संघर्ष करत असताना त्याला आधार देणे, त्याच्या शिक्षणासाठी स्वतः खर्च करणे आणि त्याला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देणे, हे सुनील पाचपोर सरांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
मैदानातून घडतील उद्याचे खेळाडू
ग्रामीण भागातील अनेक मुलांमध्ये क्रिकेटची प्रचंड आवड आणि गुणवत्ता आहे. मात्र योग्य मैदान, साहित्य आणि प्रशिक्षणाची सुविधा नसल्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडू मागे पडतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सुनील पाचपोर सरांचा प्रयत्न प्रेरणादायी आहे.“मौका छोटा हो सकता है, लेकिन वही मौका किसी बच्चे की जिंदगी बदल सकता है.”आज एका विद्यार्थ्याला मिळालेली छोटीशी संधी उद्या त्याला तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकते.“A great teacher does not just teach lessons a great teacher becomes a source of hope, strength and inspiration for every child.” विद्यार्थ्याला फक्त शिकवणे नव्हे, तर त्याच्यातील क्षमता ओळखून त्याला योग्य संधी देणे, हा सरांचा प्रयत्न आहे.
शाळेचे ऋण फेडण्याची वेगळी वाट ज्या शाळेने आपल्याला घडवले, ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवले आणि ज्या शिक्षणामुळे आपण समाजात उभे राहिलो, त्या शाळेचे ऋण आपल्या परीने फेडले पाहिजे, हा विचार सुनील पाचपोर सरांच्या कार्यातून दिसून येतो.“अपनी सफलता का सबसे खूबसूरत हिस्सा तब होता है, जब हम किसी और की जिंदगी बेहतर बनाने के काम आते हैं.”शाळेने आपल्याला काय दिले, याचा हिशोब करण्यापेक्षा आपण शाळेला काय देऊ शकतो, हा विचार त्यांच्या कृतीतून दिसतो.
आजचा विद्यार्थीच उद्याचा समाज घडवणार शिक्षण विद्यार्थ्याला ज्ञान देते, तर मैदान त्याला शिस्त, संयम, नेतृत्व, संघभावना आणि पराभवातून पुन्हा उभे राहण्याची ताकद देते.“हारने वाला नहीं, हार के बाद फिर से खड़ा होने वाला ही असली खिलाड़ी होता है.”हीच जाणीव ठेवून सुनील पाचपोर सर विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पालक, शिक्षक आणि समाजानेही साथ देणे गरजेचे आहे.कारण एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात दिलेले क्रिकेटचे साहित्य कदाचित उद्याचा खेळाडू घडवेल; दिलेले पुस्तक उद्याचा अधिकारी घडवेल; आणि दिलेला संस्कार उद्याचा जबाबदार नागरिक घडवेल.खऱ्या अर्थाने समाजासाठी जगणारा शिक्षक
सुनील पाचपोर सरांचे कार्य एक महत्त्वाचा संदेश देत“आपण मोठे होण्यासाठी शिकू नये, तर मोठे झाल्यावर दुसऱ्यांना मोठे करण्यासाठी जगावे.”
आणि हिंदीत म्हणायचे झाले तर
“इंसान की असली पहचान उसकी दौलत से नहीं, बल्कि इस बात से होती है कि उसने कितने लोगों की जिंदगी में उजाला किया.” विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या यशातील समाधान आणि त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी करण्याची धडपड हीच त्यांच्या जीवनाची खरी कमाई आहे.
शाळेचे ऋण शब्दांनी नाही, तर कृतीने फेडणारा शिक्षक निराधार विद्यार्थ्यांसाठी पालक बनणारा शिक्षक आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा शिक्षक म्हणजे सुनील पाचपोर सर.
त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्याला मनःपूर्वक सलाम......!
आणि वाढदिवसाच्या अनंत सदा सर्वकाळ शुभेच्छा.......!
लेखक: नितेश गजानन पवार, देऊळगाव साखरशा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा.
सध्या पुणे येथे इंजिनियर म्हणून कार्यरत.
संपर्क:+91-9860011185

Post a Comment
0 Comments