गणेश पाटील देऊळगाव साकरशा
देऊळगाव साखरशा-येथील श्री 1008 दिगंबर जैन महावीर मंदिरामध्ये दिनांक 16/09/2026 पासून म्हणजेच ऋषिपंचमीपासून जैन धर्मियांचे सर्वात महत्त्वाचं समजले जाणारे दशलक्षण पर्व सुरू झाले आहे.
दररोज सकाळी साडेसात वाजता भगवान च्या प्रतिमेचा पंचामृत अभिषेक भक्तामर स्तोत्र निर्वाणकांड, तत्वार्थसूत्र, आदिनाथ स्तोत्र, अष्टक तसेच संध्याकाळीआरती, मेरी भावना, समाधी मरण, मै ज्ञानानंद स्वभाई हु चे वाचन, दशलक्षण धर्माचे दररोजचे ज्याप,विविध सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरामध्ये सुरू आहे.
भगवान महावीराने सांगितल्याप्रमाणे सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यकचरित्र, तसेच अहिंसा परमो धर्म या सर्व तत्त्वांचे सर्व श्रावक श्राविका आपापल्या पद्धतीने पालन करीत आहेत. दशलक्षणपर्वाची सांगता भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी उत्तम क्षमा भाव मागून होते.
अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात दशरक्षणपूर्व सुरू आहे मंदिरामध्ये दररोज सर्व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
मंदिरामध्ये दररोज मूर्तीचा अभिषेक पाठ करण्यासाठी पंडित भिकाजी पैठणकर हे हस्तकी म्हणून तर वाचनाचे काम पंडित रतन सावजी हे मोठ्या उत्साहाने करीत आहेत.

Post a Comment
0 Comments