Type Here to Get Search Results !

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीचा घेतला आढावा.!

 गणेश पाटील आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क बुलढाणा




अशा दुष्काळी परिस्थितीत बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देण्यासाठी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आले.


पावसात पडलेला खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील मौजे कलोरी,बुलढाणा तालुक्यातील मौजे भादोला व तसेच मोताळा तालुक्यातील मौजे खडकी,खामखेड,रोहिनखेड,टाकळी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी शेताच्या बांधावर जाऊन या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधला.


राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, पीकाचे नुकसान याविषयी माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले. काही शेतांमध्ये १०० टक्के नुकसान झाले असून शेंगांमध्ये दाणे भरले नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,शेतकऱ्यांना दिली मदतीची हमी.


पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले असून, पंचनाम्यांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.शेतकऱ्यांची पीक विमा व शासकीय मदतीची मागणी विचारात घेऊन दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती मदत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी यांनी सांगितले.


केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’सह राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. सद्यस्थितीतही केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक ती भरीव मदत मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

संकटाच्या काळात बळीराजाने टोकाचे पाऊल उचलू नये. अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबतची अडचण मांडल्यानंतर त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी आश्वासन दिले आहे.


यावेळी राज्याचे मंत्री ना.संजयजी राठोड,ना.आकाशजी फुंडकर,ना.आशिषजी जयस्वाल,आ.संजय गायकवाड, मा.आ.संजय रायमुलकर,मा.आ.शशिकांत खेडेकर,युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा युवासेना जिल्हाप्रमुख श्री.ऋषी प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच शिवसेना,युवासेना,महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, परिसरातील शेतकरी तसेच शेतकरी महिला सुद्धा उपस्थित होते

Post a Comment

0 Comments