Type Here to Get Search Results !

*निबंध लेखन स्पर्धेत सन्मानित झाल्याबद्दल ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी केले सन्मानित,*


*शिवानी राजू मेहेत्रेचा निबंध ठरला तालुक्यातून उत्कृष्ट


*             

देऊळगाव साखरशा (नवल राठोड)

दिनांक 08नोव्हेंबर 2005रोजी प्रभा हॉल, पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे, अप्पर जि. पो. अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या हस्ते जिल्ह्यातील निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विध्यार्थी -विध्यार्थिनी यांना बक्षीस, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात जानेफळ येथील सरस्वती विद्यालयाची विध्यार्थिनी कु. शिवानी राजू मेहेत्रे हिचा मेहकर तालुक्यातून प्रथम क्रमांक आला त्याबद्दल जानेफळ नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी तिच्या वर्गात जाऊन यथोचित सत्कार केला. यावेळी पी एस आय. शिंदे साहेब विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जि. एम. जाधव, मुख्याध्यापिका सौ मीनल जोहरे, पर्यवेक्षक प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के, वर्गशिक्षक विनोद बाहेकर, किशोर थोरात  उपस्थित होते.

यावेळी कु. शिवानी हिच्या सत्कारानंतर ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी शिवानी च्या यशाने जानेफळ पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणून मला खूप आनंद झाला असून, सरस्वती परिवार मला माझा परिवार वाटतो असे भावनिक उदगार त्यांनी काढले. त्यानंतर शाळेत मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्याबद्दल कुणाल विनोद हावरेचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे यांनी केले.तर आभार गजानन जाधव सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments