Type Here to Get Search Results !

*जानेफळ जिल्हा परिषद सर्कल मधून शिवाजी ढवळे स्वाभिमानी संघटने कडून मैदानात*

 


(स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात)

*मेहकर गणेश पाटील* स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ टिकार पाटील यांच्या नेतृत्वामध्ये स्वाभिमानी मेहकर तालुक्यातील सातही जिल्हा परिषद जागा ताकदनीची लढणार असून शेतकऱ्यांकरिता सर्वसामान्यांच्या चूक दुःखामध्येधावून जाणारे चळवतील अत्यंत प्रामाणिक व लढाऊ कार्यकर्ता म्हणून जानेफळ सर्कलमधील हिवरा खुर्द गावचे  सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता शिवाजी ढवळे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवाजी ढवळे हे दहा वर्ष झाले शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग असून शेतकरी न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्या अंगावर आतापर्यंत दहा केसेस व तुरुंगवास भोगला आहे   सामान्य शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच ते लढत आहेत  म्हणून त्यांना जानेफळ सर्कलमध्ये पसंती आहे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जानेफळ सर्कल मधील राजकीय समीकरण निश्चितच बदल होणार असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments