देऊळगाव साकरशा (नवल राठोड/गणेश पाटील)
श्री सरस्वती विद्यालय देऊळगाव साखरशा येथील होतकरू आणि अष्टपैलू तसेच आदर्श गणित शिक्षक श्री पुरुषोत्तम शिंदे सर यांनी 23 नोव्हेंबर 2025 ला झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत 91 गुणांसह घवघवीत यश संपादन करून नावलौकिकाला साजेस कार्य केलेला आहे अतिशय कठीण आणि मानाची समजली जाणारी ही परीक्षा सरांनी देऊळगाव साखरशासारख्या दुर्गम भागात नोकरी करून पहिल्याच प्रयत्नात 91 गुणांसह ही परीक्षा पात्र केलेली आहे शासनाने काढलेल्या जीआर नुसार ही परीक्षा सर्वांना अनिवार्य आहे यामुळे सरांचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणामध्ये अभिनंदन होत आहे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यामुळे सरांना बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक धुरंदर ही पदवी सुद्धा बहाल करण्यात आलेली आहे त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपले कुटुंब आणि सरस्वती परिवार देऊळगाव साखरशा व जानेफळ यांना दिलेले आहे
.png)
Post a Comment
0 Comments