मेहकर :(प्रतिनिधी )
शिवसेना पक्षाच्या सोशल मिडिया संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी मेहकर उपतालुक्यात नवी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सोशल मिडियाच्या मेहकर उपतालुका प्रमुखपदी श्री. कृष्णा भिमा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र आज दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेनुसार तसेच शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोशल मिडिया राज्य प्रमुख राहुल एन. कनाल यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख (शिवसेना सोशल मिडिया) बुलढाणा धनंजय सुभाषचंद्र गायकवाड यांनी दिले. पक्षाची ध्येयधोरणे, विचारधारा व नेतृत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून सक्रिय प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी कृष्णा चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पक्ष-संघटनेतील कार्य निष्ठेने, जोमाने आणि प्रामाणिकपणे पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या नियुक्तीमुळे मेहकर उपतालुक्यात शिवसेना सोशल मिडियाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मा. आमदार संजय रायमुलकर साहेब . युवा सेना सचिव तथा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ऋषी भाऊ जाधव. युवा सेना उपजिल्हाध्यक्ष भूषण भाऊ घोडे . तालुकाप्रमुख संदीप आल्हाट आणि सर्व युवा सेना शिवसेना कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे नियुक्त पत्र देण्यात आले.
.png)
Post a Comment
0 Comments