दे साकर्शा - प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डोणगांव येथील संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने स्व डॉ जगदीश बिडवई यांच्या स्मृति प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या संजीवनी दर्पण पुरस्कार साठी नवल जयसिंग राठोड यांची निवड एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
दि 1 फेब्रुवारी रोजी संजीवनी सेवाभावी परिवाराच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त राजुरकर मंगल कार्यालय डोणगांव येथे विविध क्षेत्रातील मान्यवरासह पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या सहा पत्रकारांना संजीवनी दर्पण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.नवल राठोड आपल्या नियुक्तीचे श्रेय बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबाप्पु देशमुख, तालुका अध्यक्ष गजानन चनेवार सह मित्र परिवार यांना देतात.
.png)
Post a Comment
0 Comments