Type Here to Get Search Results !

*बुलढाणा जिल्ह्यात ‘आपदा मित्र’ /सखी प्रशिक्षण यशस्वी; १२ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणाचा समारोप*

 *रंजना राठोड*.   



बुलढाणा जिल्हा येथे विविध तालुक्यांतून आलेल्या युवक-युवती, महिला, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, एनसीसी जवान, पोलीस कर्मचारी, महसूल विभागातील तलाठी, आरोग्य खात्यातील डॉक्टर, अग्निशामन दलातील फायर फायटर, विद्यार्थी, पत्रकार व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणार्थींना ‘आपदा मित्र’ आरोग्य मित्र प्रशिक्षण यशस्वीरीत्या देण्यात आले.

हे प्रशिक्षण पूर्ण १२ दिवसांचे निवासी स्वरूपाचे होते. प्रशिक्षण काळात चहा-नाश्ता, जेवण व निवासाची उत्तम व्यवस्था शासकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणी करण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीकाळात लोकांचे सुरक्षित रेस्क्यू कसे करावे, पूर, इमारत कोसळणे आदी परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. टीम एल-शेप, व्ही-शेप तयार करून थिअरी व प्रॅक्टिकलच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.

दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार सौ. भोपळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर पवारसरअध्यक्षस्थानी होते. प्रशिक्षण देणारे मुख्य प्रशिक्षक श्री पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच आयटीएस कंपनीचे ओम सातार व ऋषिकेश श्रीखंडे हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने आपदा मित्र प्रशिक्षणार्थी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे सदस्य उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात या १२ दिवसांच्या प्रशिक्षणाचा निरोप समारंभ संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments