Type Here to Get Search Results !

*प्रा. डॉ. वसंत हंकारे यांनी उलगडलेल्या माय -बापाना अश्रूचे बंध फुटले*

 

*(हंबरडा फोडत मुलींनी बापांना कवटाळले)*




आयोजक स्वर्गीय शंकरा गायकवाड बहुउद्देशीय संस्था आणि लक्ष्मी अर्बन बुलढाणा

गणेश पाटील

देऊळगाव साकरशा 

आई आणि बाप आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतात, आई 9महिने 9दिवस प्रसव वेदना सहन करून आपल्याला जन्म देते. आपल्यामुळे जर त्यांना खाली मान घालावी लागत असेल तर आपले जगणे व्यर्थ आहे. आई वडिलांना समजून घ्या. त्यांना प्रेमाने मिठी मारा. आपल्याला सर्व ब्रँडेड सोई देणारा बाप फाटके बनियान घालतो. त्याला झोपल्यानंतर बघा. तो कुणासमोर रडत नाही कारण त्याला सर्वच सांभाळून घ्यायचे असते. त्या बापाला समजून घ्या असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते डॉ. वसंत हंकारे यांनी मांडले. ते देऊळगाव साकरशा येथील सरस्वती विद्यालयामध्ये दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित स्व. शंकरराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था आणि लक्ष्मी अर्बन व्याख्यानात बोलत होते स्वर्गीय शंकराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष. एडवोकेट किशोर भाऊ गायकवाड व उपाध्यक्ष एडवोकेट शैलेश भाऊ गायकवाड तसेच लक्ष्मी अर्बन बुलढाणा चे अध्यक्ष एडवोकेट सौ ईतश्री किशोर गायकवाड उपाध्यक्ष एडवोकेट सौ अमृता शैलेश गायकवाड दे. साखरशा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव  श्यामशेठ गट्टानी तर उद्घाटक म्हणून रतन शेठ दुगड होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सौ आशाताई देशमुख माझी सरपंच सखाराम आमले शिवसेना उप तालुका प्रमुख नागेश सोनवणे ज्येष्ठ काँग्रेस नेते भैय्यासाहेब देशमुख संतोष तोंडे रितेश  दुगड प्रमोदबापू देशमुख बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पाटील गफार मंत्री जीवन पवार सुरेंद्र कटारे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाचपोर विजय ताई पवार अमृता ताई गायकवाड सौ फुलाबाई पवार कृष्णा चव्हाण यांच्यासह विविध मान्यवराची यावेळी उपस्थिती होती मुख्य वक्ते प्रा. डॉ. हंकारे यांनी व्याख्यानाची सुरुवात हलक्या फुलक्या विनोदांनी करत, हळूहळू त्यांनी सर्व श्रोत्यांच्या मनावर ताबा मिळवला. आपल्या धारदार शब्दातून आणि अमोघ वाणीतून त्यांनी आई-वडील सांगायला सुरुवात केली व पाहता पाहता श्रोत्यांच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. अनेक मुलींनी तर हंबरडा फोडला, आईबाप आपल्यासाठी जीवाचं रान करतात आणि आपण त्यांना पोलीस स्टेशनमध्ये उभे करून त्यांचा अपमान करतो. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत त्याला जीव लावा, एकदा आईबाप निघून गेले की जगात कोणीच कोणाचं नसते. कोरडी आणि शुष्क झालेली नाती तुमच्याकडे असलेल्या पैशामुळे तुमच्या जवळ येऊ शकतात. तुमच्यावर खरं प्रेम करू शकत नाहीत म्हणून आई-वडिलांना समजून घ्या. शेवटी हंबरडा फोडत अनेक मुलींनी आपल्या वडिलांना मिठी मारली. सर्व श्रोते भावनिक  होते. अशा या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल  त्यांनी एडवोकेट शैलेश गायकवाड एडवोकेट किशोधोटे गायकवाड सौ इतिश्री ताई किशोर  गायकवाड सौ अमृता ताई शैलेश गायकवाड यांचे भरभरून कौतुक केले

या कार्यक्रमाचे मुख्य प्रास्ताविक एडवोकेट शैलेश भाऊ गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रेम पाचपवार यांनी केले

 शैलेश गायकवाड व किशोर गायकवाड यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणिवे बद्दल सुज्ञ नागरिकांमध्ये मोठी चर्चा होती.

 या कार्यक्रमाच्या स्वर्गीय शंकराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लक्ष्मी अर्बनचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच सरस्वती आश्रम शाळेचे कर्मचारी वृंद तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसेच गावातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले सदर अभूतपूर्व व विलक्षणीय  कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लिप प्रत्येकाच्या स्टेटसला दिसत  आहेत सदर कार्यक्रमासाठी परिसरातील बहुसंख्य शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच पालक व माता-भगिनी व गावकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments