(*आधी मध्ये शेतकऱ्याचे चार लाख 28 हजार चे नुकसान*). गणेश पाटील देऊळगाव साखरशा.
येथील शेतकरी अन्सार शेख सुपडू यांच्या घराच्या मागे बांधलेल्या गोठ्याला दिनांक एक जून 2024 रोजी मोठ्या प्रमाणात वादळी हवा सुटल्याने गोठ्याला आग लागली सदर आगीमध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामध्ये स्पिंकलर पाईप 60 नग मोटार पंप 10 एचपी ३ नग रोला पाईप मोटर पंप 3 नग मोटर पंपाची केबल ती पण वखर डवरे सोफासेट सोयाबीन बियाणे 1 क्विंटल हरभरा 2क्विंटल तीन पत्रे 70नग कुटार सोयाबीन भुईमूग तूर15 ट्रॉली आधी साहित्य सदर आगीमध्ये जळून खाक झाले त्यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास चार लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे सदर आग लागल्याची माहिती कळत गावकऱ्यांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला परंतु वादळी स्वरूपाच्या प्रचंड प्रमाणात असलेल्या हवेमुळे आग आटोक्यात येऊ शकले नाही परिणाम सर्व साहित्य जळून खाक झाले

Post a Comment
0 Comments