*देऊळगाव साकरशा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव आमले तर उपाध्यक्षपदी गणेश अवधूत यांचे अविरोध निवड*
August 29, 2026
0
नवल राठोड (प्रतिनिधी) देऊळगाव साकरशा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपदी महादेव आमले तर उपाध्यक्षपदी गणेश अवधूत यांची अविरोध निवड करण्यात आली सदर निवड ही मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले तसेच ॲड किशोर भाऊ गायकवाड डॉ हेमराज राठी माजी सरपंच सखाराम आमले सर्वांचे मार्गदर्शक मोहन साहेब राठोड खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष मोतीचंद राठोड श्रीराम भाऊ काळे शेख गफ्फार शेख कादर सुभाष पवार शेख रजिक शे मंजूर विजय सिंग चव्हाण शे चांद कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक घेण्यात आले त्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सदस्य पदी देविदास समुद्रवार जयसिंग चव्हाण सौ गोदावरी गणेश पाचपोर (पाटील) अरुण गायकवाड जीवन विश्वासराव पवार(देशमुख) सचिन राठी परसराम दलपत राठोड प्रमोद पाटील सौ संगीता जितेंद्र वानखडे यांच्यासह ज्ञानदेव वानखडे बळीराम राठोड अविरोध म्हणून निवडून आलेत तसेच यावेळी सदस्याच्या झालेल्या बैठकीमध्ये ॲड शैलेशभाऊ गायकवाड डॉक्टर हेमराज राठी मोहन साहेब राठोड माजी सरपंच सखाराम आमले यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच वर्षाकरिता महादेव त्रंबकमले अध्यक्ष म्हणून तर गणेश किसनराव अवधूत उपाध्यक्ष म्हणून राहतील तसेच पुढील अडीच वर्षाकरिता जीवन विश्वासराव पवार अध्यक्ष म्हणून तर गोदावरी गणेश पाचपोर उपाध्यक्ष म्हणून राहतील असे सर्वां च्या वतीने ठरविण्यात आले



Post a Comment
0 Comments