Type Here to Get Search Results !

आर.आर. मल्टीपर्पज फाउंडेशनचा वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम!देऊळगाव साखरशा ते पोहरागड पायदळ जाणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद व छत्री वाटप

आर.आर. मल्टीपर्पज फाउंडेशनचा वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम!
देऊळगाव साखरशा ते पोहरागड पायदळ जाणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद व छत्री वाटप

 बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या पायदळ पालखी सोहळ्यानिमित्त देऊळगाव साखरशा ते पोहरागड येथे पायदळ जाणाऱ्या वारकरी व भाविक भक्तांची आर.आर. मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने सेवाभावी उपक्रमातून सेवा करण्यात आली.
आर.आर. कॉम्प्लेक्सच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी पायदळ जाणाऱ्या वारकरी व भाविकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा यंदाही उत्साहात जपण्यात आली.
या उपक्रमामुळे पायदळ प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर वारकऱ्यांनी आर.आर. फाउंडेशनच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ‘जय सेवालाल, जय सेवालाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
श्री संत सेवालाल महाराज पायदळ पालखी मंडळाच्या वतीने सौ. रंजनाताई चव्हाण यांचे आभार मानत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
या कार्यक्रमाचे आयोजन आर.आर. मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात केले. आर.आर. फाउंडेशनच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी, भाविक भक्त आणि फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.


महाराष्ट्र न्यूज 1साठी उपसंपादक रंजना राठोड बुलढाणा

Post a Comment

0 Comments